पेतँ, आंरी फिलिप
पेतँ, आंरी फिलिप : (२४ एप्रिल १८५६-२३ जुलै १९५१). फ्रान्सचा एक सेनानी व मुत्सद्दी. त्याचा जन्म शेतकरी कुटुंबात कोशी-अ-ला-तूर येथे झाला. तो सेंट-सीर या लष्करी अकादमीतून पदवीधर झाला (१८७८). त्याची एकोल-द-गेर्रे या लष्करी अकादमीत निदेशक म्हणून नियुक्ती झाली. पहिल्या महायुद्धापर्यंत त्याने लष्करातील विविध पदांवर काम केले.